Solapur : भीम आर्मीच्या (Bheem Army) सोलापूर शहराध्यक्षाला पोलिसांनी 2 वर्षांसाठी सोलापूर (Solapur) आणि धाराशीव (Dharashiv) या जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. सरकारी नोकरावर हल्ला करणे, इतरांच्या जिवित किंवा व्यक्तीगत सुरक्षिततेस धोका आणणारी कृती करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  अजय संतोष मैंदर्गीकर असे तडीपार करण्यात आलेल्या भीम आर्मीच्या (Bheem Army) सोलापूर शहराध्यक्षाचे नाव आहे. 


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकली होती शाई 


अजय मैंदर्गीकर यांने सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शाही फेकली होती. त्यानंतर चर्चेत आला होता. त्याआधी त्याने भाजप आमदार विजयकुमार देशमुख (VijayKumar Deshmukh) यांच्यावरही शाही फेकली होती. सातत्यानं आंदोलन केल्यानं अजय मैंदर्गीकर याच्यावर सोलापूर शहरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्यावर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. सोलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 1045 गुन्हेगारांची यादी तयार केलेली आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची यादी असून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.


कारवाईबाबत पोलीस आयुक्त काय म्हणाले? 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालयाने शहरातील 1045 गुन्हेगारांची यादी बनवली आले. पाच वर्षाच्या काळात दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आरोपी शिवाय सामाजिक शांततेमध्ये बाधा आणणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर येत्या काही दिवसांत तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई होणार आहे, अशी माहिती सोलापूर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.  पोलीस आयुक्तालातर्फे प्रतिबंधक कलम 107 व 110 नुसार 1045 जणांची यादी तयार आहे. शिवाय 69 तडीपार, 43 एमपीडीए, 35 जणांवर कलम 144 (2) नुसार पोलिस आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Akola News: 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून संपवले जीवन