Pandharpur Mauli Corridor Special Report : पंढरपूरमध्ये होणाऱ्या वादग्रस्त कॉरिडॉरच्या (Pandharpur Mauli Corridor) विरोधात आता डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची कायदेशीर तज्ज्ञांच्या टीमने कॉरिडॉरची पाहणी केली. मंदिरातील सरकारीकरणाच्या (Vittal mandir Pandharpur) विरोधातील याचिकेत कॉरिडॉर विरोधाचा मुद्दा सहभागी करून जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 


सहा सदस्यांची टीम मंदिर परिसरात


आज सकाळी डॉ स्वामी यांच्याकडून आलेल्या सहा सदस्यांची टीम मंदिर परिसरात पोहोचली. यावेळी संपूर्ण कॉरिडॉर परिसरातील व्यापारी, नागरिक यांच्याशी या टीमने चर्चा केली. यावेळी शासनाने केलेल्या वादग्रस्त कॉरिडॉर विरोधात बधितांची बाजू जाणून घेतली. कॉरिडॉरमुळं बाधित होणारा 200 वर्षांपूर्वीचा काल्याचा वाडा म्हणजे हरिदास वाडा येथे जाऊन पाहणी करत मदन महाराज हरिदास यांचेशी चर्चा केली. 


कॉरिडॉरमुळं बाधित व्यापारी आणि नागरिकांशी संवाद


यानंतर 300 वर्षांपूर्वी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर वाड्याची पाहणी केली. येथे कॉरिडॉरमुळं बाधित होणारे व्यापारी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींशी या टीमने संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. आता ही टीम मुंबई येथे जाऊन डॉ सुब्रमण्यम स्वामी यांना ही परिस्थिती सांगणार असून यानंतर 24 डिसेंबर रोजी डॉ स्वामी पंढरपूर येथे येणार असल्याचे अॅड शेट्टी यांनी सांगितले . 


या टीममध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ शेट्टी , शंतनू शेट्टी , शौनक रावते आणि इतर प्रतिनिधी हजर होते. या सर्व  माहितीच्या आधारे  मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून हा आराखडा रद्द करण्यासाठी लढा देणार असल्याचे विश्वनाथ शेट्टी यांनी सांगितले. 


मंदिर सरकारी करण विरोधात जी याचिका दाखल होणार आहे त्याचा मसुदा तयार असून त्यातच कॉरिडॉर आणि विकास आराखड्याचा समावेश करून जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अॅड विश्वनाथ शेट्टी यांनी Abp माझाशी बोलताना सांगितले आहे. 



माऊली कॉरिडॉरमध्ये सध्या 40 फूट असणारा रस्ता 360 फूट करण्याचा प्रस्ताव असल्याने या मार्गावरील 600 नागरिक आणि 146 दुकाने बाधित होणार आहेत. यातील बहुतांश दुकाने आणि घरे पूर्णपणे पडणार असल्याने पिढ्यानपिढ्या मंदिर परिसरात व्यापार करणारे आणि निवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे.


ही बातमी देखील वाचा


Pandharpur: राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे पंढरपुरात माऊली कॉरिडॉर विरोधक आंदोलकांना दिलासा