Solapur Gram Panchayat Election 2022 : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज ग्रामपंचायतीसाठी मतदान (Gram Panchayat Voting Begins in Solapur District) प्रक्रिया पार पडत आहे. विविध ठिकाणी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक जाहीर झालेल्या 189 ग्रामपंचायतीपैकी 174 गावांमध्ये सरपंच पदासाठी आणि 169 गावातील 1 हजार 418 सदस्य निवडीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील 667 केंद्रावर मतदान सुरु झाले आहे. सरपंच पदासाठी 498 तर सदस्य पदासाठी 3 हजार 421 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.


12 गावाच्या निवडणुका पूर्णतः बिनविरोध 


सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 22 पैकी 189 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्यात 12 गावाच्या निवडणुका पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. तर 15 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर सरपंच वगळून सर्व सदस्य बिनविरोध झालेल्या एकूण 8 ग्रामपंचायत आहेत. त्यामुळे उर्वरित 174 सरपंच आणि 169 ग्रामपंचायतीतील 1 हजार 418 सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यंदा सरपंच पदाची थेट जनतेतून निवड असल्याने या पदाची निवडणूक चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत प्रत्येक गावात दोन किंवा तीन गट सक्रीय झाले आहेत. एकूण 645 प्रभागातील 1 हजार 417 जागांसाठी 3 हजार 421 तर सरपंचपदासाठी 498 उमेदवार निवडणूक आखाड्यात नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधीत गावांमध्ये जमावबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणूकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.


कोणत्या तालुक्यात किती मतदान केंद्र


ग्रामपंचायत निवडणुकासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण0 667 मतदान केंद्रवर व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रावर शनिवारी ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व साहित्य पोहोच करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. करमाळा तालुक्यात 83,  माढा तालुक्यात 32, बार्शी तालुक्यात 57, उत्तर सोलापूर तालुक्यात 57, मोहोळ तालुक्यात 30, पंढरपुर तालुक्यात 35, माळशिरस  तालुक्यात सर्वाधिक 159, सांगोला तालुक्यात 21, मंगळवेढा तालुक्यात 49, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 71 आणि अक्कलकोट तालुक्यात 73 मतदान केंद्र असणार आहेत. 


सोलापूर जिल्ह्यात असा असणार पोलीस बंदोबस्त


ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे. निवडणुका शांत पद्धतीनं पार पडण्यासाठी जिल्ह्यात चोख असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 7 पोलीस उपअधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 54 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 654 पोलीस अंमलदार, एक हजार होम गार्ड, 100 जणांची एक राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथकाची तुकडी निवडणूक बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे.


सरपंचपद बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती (एकूण 15 )


1) अंजनडोह 2) वंजारवाडी 3) लिंबेवाडी 4) शिंगेवाडी 5) बेलगांव 6) देवगांव 7) गाडेगांव 8) अर्धनारी 9) सुगांव खुर्दे 10) नेवरे 11) चिणके 12) पाचेगाव खुर्द 13) रहाटेवाडी 14) फटेवाडी 15) दर्गनहळ्ळी


पुर्णत: बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती (एकूण 12 )


1) लिंबेवाडी 2) वंजारवाडी 3)देवगांव 4) बेलगोव 5) गाडेगांव 6) अर्धनारी 7) सुगांव खुर्द 8) नेवरे 9) पाचेगांव खुर्द 10) रहाटेवाडी 11) फटेवाडी 12) दर्गनहळ्ळी


सर्व सदस्य बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती सरपंच वगळुन (एकूण 8 )


1) मांजरगाव 2) गोयेगांव 3) रिटेवाडी 4) टाकळी रा 5) मांडेगांव 6) तांबेवाडी 7) उघडेवाडी 8) बलवडी


महत्त्वाच्या बातम्या:


Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक, 'या' ठिकाणी चुरशीची लढत