पंढरपूर: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पुणे येथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची ट्रकची धडक (Pandharpur Accident News)  झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील गुरसाळे येथे बस ओव्हरटेक करत असताना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने या बसमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले.(Pandharpur Accident News) 


या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स बसचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हे सर्व भाविक मावळ भागातील एकाच कुटुंबाचे असून बस मध्ये एकाच कुटुंबातील 27 जण होते. यातील किरकोळ जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढचा तपास करीत आहेत. ही बस पंढरपूर वरून मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर या देवदर्शनासाठी निघाली होती.(Pandharpur Accident News) 


मिळालेल्या माहितीनुसार, ही भाविकांची खासगी बस पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीमध्ये होती, पंढरपूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असतानाच भाविकांची खाजगी बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण (Pandharpur Accident News) अपघात झाला. अपघातामध्ये दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, असून अन्य सहा ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.(Pandharpur Accident News) 


 टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेली भाविकांची बस (क्र.एम.एच. 14 एल.एस.3955) चा पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक आर जे 14 जी एल 1780) सोबत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला (Pandharpur Accident News). या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अपघात (Pandharpur Accident News) झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.