Ujani Dam lighting : देशभरात आज 77 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण (Ujani Dam) तिरंगी विद्युत रोषणाईने नटले आहे. उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उजनी धरणात पाणीसाठी कमी असला तरी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह धरणावर पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसानं ओढ दिल्यामुळं नदी, नाले धरणांच्या पाण्यात घट झाली आहे. सध्या उजनी धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा आहे. धरण परिसरात पावसानं दडी मारल्यानं धरणाच्या पाण्यात वाढ होताना दिसत नाही. दरम्यान, आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.
उजनी धरण परिसरात पावसाची दडी, शेतकरी चिंतेत
भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडसुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100 टक्के भरते. त्याचे कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे. कमी पावसामुळे राज्यातील काही भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उजनी धरणातून पाणीसाठी करण्यात येतो. मात्र, सध्या पाणी पातळी घटल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी सध्या जोरदार पावसाची प्रतिक्षा करत आहेत.
पंतप्रधान करणार संबोधीत
77 व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल असे केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आले. 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: