Pandharpur Mangalvedha Vidhan Sabha News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अद्यापही काही जागांवर महाविकास आघाडीसह महायुतीत देखील तिढा कायम आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं नेत्यांपुढे तिकीट वाटपाच पेच निर्माण झालाय.त्यामुळं अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा (Pandharpur Mangalvedha Vidhan Sabha) मतदारसंघात देखील तिकीट देण्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे ( MLA Sadhan Awatade) व माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्यात रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील वाद सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज पंढरपुरात येणार आहेत. 


बावनकुळे समोरासमोर दोघांचीही घेणार बैठक 


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी विद्यमान आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक हे दोघेही इच्छुक आहेत. प्रशांत परिचारक हे तुतारीकडून निवडणूक लढवणार अशा देखील चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवलण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सायंकाळी 6 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहेत. मुंबई येथून विमानाने बावनकुळे हे सोलापुरात पोहोचणार असून यानंतर ते पंढरपूरला येऊन आवताडे व परिचारक यांची बैठक घेणार आहेत. यानंतर पुन्हा बावनकुळे हे सोलापूर येथे मुक्कामी पोहोचणार आहेत.


भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh), सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र पंढरपूर, बार्शी आणि माळशिरसमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. पंढरपूरमध्ये समाधान आवताडे हे भाजपच विद्यमान आमदार आहेत. तर बार्शीत भाजप पुरुस्कृत राजेंद्र राऊत हे आमदार आहेत, त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपचे विद्यमान आणदार आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळं या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने देखील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.


महत्वाच्या बातम्या:


माढ्यासह पंढरपूर, परांडा आणि मोहोळचा सस्पेंन्स कायम? शरद पवारांच्या मनात नेमकं कोण? कधी ठरणार उमेदवार?