Solapur News : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटला आहे. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला आहे.  हा कालवा फुटल्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतात पाणीच पाणी झालं आहे.  यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. 


शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली 


उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, अचानक पाटकुल गावात उजवा कालवा फुटल्यानं शेतखऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाटकुल येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे रात्री पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला असून, त्यामुळं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठं नुकसान झालं आहे.   शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे.



 


नुकसानीला जबाबदार कोण? शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई देण्याची मागणी 


कालवा फुटल्यानं अनेक काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचेही मोठं नुकसान झाले असून इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळं उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचल आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


उजनी धरणातून विसर्ग वाढणार? सीना व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना