सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून आता उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धुराळा उडाला आहे. रविवारी सोलापुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ विश्व हिंदू परिषदेने माधवी लता (Madhavi Latha) यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती करत उपस्थितांची मनं जिंकली. 

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) हैदराबाद (Hyderabad) येथून भाजपाच्या (BJP) उमेदवार राहिलेल्या माधवी लता यांनी एमआयएम (MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात लढत दिल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती केल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. यामुळे हैदराबाद येथील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. 

माधव लता यांनी जिंकली उपस्थितांची मनं

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माधवी लता सोलापुरात दाखल झाला. सोलापुरात झालेल्या सभेत माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती करत उपस्थितांची मनं जिंकली. सोलापुरातील पूर्व भागात मोठ्या संख्येने तेलगू बांधव आहेत. त्यामुळे माधवी लता यांनी तेलगूमध्येच आपलं भाषण केलं. यावेळी उपस्थितांनी माधवी लता यांना धनुष्यबाणाची कृती करण्याची विनंती केली. त्यांनी ही कृती करताच सभेत एकच जल्लोष झाला. दरम्यान, सोलापुरातील तेलगू बहुल भागात आज माधवी लता या पदयात्रा करणार आहेत. या पदयात्रेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

सोलापुरातील जिल्ह्यातील लढती 

1) अक्कलकोटभाजप - सचिन कल्याणशेट्टी vs  काँग्रेस - सिद्धाराम म्हेत्रे 

2) सोलापूर उत्तरभाजप - विजयकुमार देशमुख vs  राष्ट्रवादी (शप) - महेश कोठे

3) सोलापूर दक्षिण भाजप - सुभाष देशमुख vs शिवसेना (उबाठा) - अमर पाटील vs अपक्ष - धर्मराज काडादी

4) सोलापूर मध्यभाजप - देवेंद्र कोठेVs - Mim - फारुख शाब्दि vs - CPM - नरसय्या आडमvs चेतन नरोटे (काँग्रेस) 

5) मोहोळराष्ट्रवादी(अप) - यशवंत माने vs राष्ट्रवादी (शप) -राजू खरे

अपक्ष -  संजय क्षीरसागर

6) बार्शीशिवसेना (उबाठा) - दिलीप सोपलvs शिवसेना (शिंदे) - राजेंद्र राऊत

7) माढाराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अभिजीत पाटीलVs -  मिनल साठे (अजित पवार) राष्ट्रवादीVs - रणजीतसिंह शिंदे (अपक्ष)

8) सांगोलाशिवसेना (शिंदे) - शहाजी बापू पाटील vs शिवसेना (उबाठा) - दीपक आबा साळुंखे vs शेकाप - बाबासाहेब देशमुख

9) माळशिरस राष्ट्रवादी (शप) - उत्तम जानकरvs राम सातपुते (भाजपा)

10) करमाळा राष्ट्रवादी (शप) - नारायण आबा पाटीलvs दिग्विजय बागल (शिवसेना) 

11) पंढरपूर-मंगळवेढाभाजप - समाधान अवताडेvs काँग्रेस - भगीरथ भालके

आणखी वाचा

घड्याळामुळे राजकीय वैर, महायुतीत त्याच घड्याळाच्या वेळेनुसार पुन्हा एकत्र; धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बहीण पंकजा मुंडे मैदानात!