Solapur News : सोलापुरातील (Solapur) हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील (Latur) एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव (Snehalata Prabhu Jadhav) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 


मुलाच्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी
स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. लग्नच्या बस्त्याच्या खरेदीसाठी प्रभू जाधव आणि स्नेहलता जाधव हे कर्नाटकातील चडचण (Chadchan Karnataka) येथे गेले होते. शनिवारी (26 नोव्हेंबर) रात्री उशीर झाल्याने ते दोघे सोलापुरातील सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी (27 नोव्हेंबर) सकाळी प्रभू जाधव (Prabhu Jadhav) हे कामानिमीत्त लातूरला गेले.  


रडत रडत नातेवाईकाला फोन 
दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूरमधील नातेवाईकाला जोरजोराने रडत फोन केला. फोन करुन त्यांनी आपण आत्महत्या करणार असे सांगितलं. याचवेळी नातेवाईकाने त्यांची समजूत काढत संबंधित प्रकाराची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी सोलापुराती नातेवाईक हॉटेलवर दाखल झाले. परंतु त्यावेळी स्नेहलता जाधव थांबलेल्या खोलीचा दरवाजा बंद आढळला. परंतु त्याआधीच त्यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नातेवाईकांनी दरवाजा उघडला असता त्यांना स्नेहलता जाधव लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.  


यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. काल रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आणि मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं. दरम्यान लातूरमधल्या औसा इथल्या मूळगावी त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. दरम्यान या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा नोंद करण्यात आली.


आत्महत्येचं कारण काय? 
स्नेहलता जाधव यांच्या आत्महत्येने लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तोंडावर मुलाचं लग्न, त्याच्या खरेदीची तयारी अशी सगळी लगबग सुरु होती. खरेदीसाठी जाधव दाम्पत्य गेलं होतं. मात्र ज्या ठिकाणी खरेदीला गेले, तिथे स्नेहलता जाधव यांनी आत्महत्या केल्याने, नेमकं काय घडलं याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. 


संबंधित बातम्या 


Latur News: लातूरच्या सोनखेडमध्ये उपद्रवी वानर पुन्हा अवतरलं, चौघांवर हल्ला; मग पकडलेलं वानर कोणतं?