Solapur Lok Sabha candidate : भारतीय जनता पक्षाने आज (दि.24) लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी (BJP Loksabha Candidate List) जाहीर केली आहे. भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत. राम सातपुते (Ram Satpute) यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते (Ram Satpute) हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते (Ram Satpute) यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या 2590 मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पाहोचले. विधिमंडळात आक्रमक भाषण, आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात. पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते (Ram Satpute) हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेचा मुकाबला करतील.
भाजपने आज जाहीर केलेल्या पाचव्या यादीत (BJP Loksabha Candidate List) महाराष्ट्रातील 3 लोकसभा मतदारसंघातील नावे घोषित केली आहेत. भाजपने सोलापुरातून प्रणिती शिंदेंविरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी दिली आहे. तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या