Balbhim Rakhunde,Maratha Reservation, करमाळा  : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही म्हणून हताश होत माजी नगरसेवक आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे (Balbhim Rakhunde) यांनी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी करमाळ्यातील माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षण मिळावे मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहीत बलभीम राखुंडे यांनी राहत्या घरी आत्महत्या केलीये. बलभीम राखुंडे यांनी आत्महत्या केल्याने समाजातील सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. 


मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बलभीम राखुंडे यांच्याकडे "मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आमचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे,", अशा आशयाचे पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करतोय ,असं नमूद केलं आहे. बलभीम राखुंडे यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण करमाळा शहरात शोककळा पसरली आहे. सकल मराठा समाजाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलीये. 


मराठा समाजातील तरुण नैराश्यात असल्याचं चित्र


गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजातील तरुण नैराश्यात असल्याचं चित्र आहे. दीड वर्षात अनेक तरुणांनी आरक्षणासाठी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी बार्शीतील तरुणानेही आपल्या मुलीची माफी मागत आयुष्य संपवले होते. टी पी मुंडे , भुजबळ साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळू द्या, असंही या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं होतं. 


मराठा समाजाच्या मागण्या कोणत्या?


मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मागण्याला विरोध आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी : गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य, महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, कायदेशीर कारवाईचे आदेश