Ujani Dam Boat capsizes : उजनी बोट दुर्घटनेतील (Ujani Dam Boat capsizes) सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत. तब्बल 40 तासांच्या शोध मोहीमेनंतर उजनीत धरणात (Ujani Dam) सुरु असणारं शोधकार्य संपलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शोकार्य सुरु होतं. अखेर आज सर्व मृतदेह NDRF च्या हाती आले आहेत. 


21 मे रोजी सायंकाळी घडली होती दुर्घटना


ही दुर्घटना 21 मे रोजी सायंकाळी घडली होती. त्यादिवशी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं ही घटना घडली. यामध्ये सहा प्रवाशी बुडाले होते. काल दिवसभर शोधकार्य करुनसुद्ध एकही मृतदेह हाती लागला नव्हता. मात्र, आज सकाळी पाच मृतदेह NDRF च्या जवानांना सापडले होते. त्यानंतर राहिलेला एक मृतदेह देखील शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. अखेर 40 तासानंतर NDRF चे शोधकार्य संपले आहे. 


दुर्घटनेतील मृतांची नावे


1) गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), 
2) कोमल गोकूळ जाधव (वय 25), 
3) शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), 
4) माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर)


हे सर्व मृत प्रवाशी हे झरे येथील आहेत.  


1) अनुराग अवघडे (वय 35) 
2) गौरव डोंगरे (वय 16)


हे दोन्ही मृत प्रवाशी हे कुगाव येथील आहेत. 


 



महत्वाच्या बातम्या:


उजनी धरण दुर्घटना!, संपूर्ण कुटुंबालाच मिळाली जलसमाधी, पती पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू