Women's Wrestling Competitions: एका बाजूला महाराष्ट्र महिला कुस्ती (maharashtra women's wrestlers) स्पर्धांच्या आयोजनावरून सध्या रोज नवीन वाद समोर येत असताना अकलूजकरांनी मात्र ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे (Tararani mahila kesari) आयोजन करीत एक पाऊल पुढे टाकले आहे. अकलूज येथील ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राकडून गेल्या पाच वर्षांपासून महिलांसाठी महाराष्ट्र केसरी (Tararani mahila kesari) अकलूज येथे भरविण्याची मागणी केली जात होती. मात्र कुस्तीगीर परिषदेने अकलुजकरांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. यामुळे अखेर ताराराणी कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्ष शितलादेवी मोहिते पाटील यांनी अकलूज येथे अखिल भारतीय ताराराणी महिला कुस्ती स्पर्धांचे (Tararani mahila kesari) आयोजन करीत असल्याची घोषणा आज करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि ताराराणी कुस्ती केंद्राच्या शितलादेवी मोहिते पाटील उपस्थित होत्या. यावेळी या स्पर्धेचा टिझर देखील प्रकाशित करण्यात आला.
अकलूज येथे 5 ते 7 मे दरम्यान या राष्ट्रीय ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे (Tararani mahila kesari) आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशभरातून 500 पेक्षा जास्त महिला मल्ल येणार असल्याचे आयोजक शितलादेवी मोहिते पाटील यांनी सांगितले. ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेत (Tararani mahila kesari) प्रथम क्रमांक पटकावणार्या स्पर्धकाला 1 लाख रूपये रोख आणि चांदीची गदा बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण दहा लाख रूपयांची बक्षीसं दिली जाणार असल्याचे आयोजक शीतल देवी मोहिते पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे वारंवार मागणी करून देखील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Tararani mahila kesari) घेण्यात आली नाही. पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर स्पर्धा होत नसल्याने अखेर अकलूजच्या ताराराणी कुस्ती केंद्राने राष्ट्रीय स्तरावरील ताराराणी महिला केसरी स्पर्धेसाठी (Tararani mahila kesari) पुढाकार घेतला आहे. यासाठी देशभर आणि राज्यभरातून येणाऱ्या महिला मल्लांच्या प्रवास खर्चासह निवासाची सर्व व्यवस्था आयोजन समिती करणार आहे. एका बाजूला महाराष्ट्र महिला केसरी कोठे भरावयाची याबाबत एकमत वाद सुरू असताना अकलूजकरांनी थेट राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्त्यांचे (Tararani mahila kesari) आयोजन करीत आपली वेगळी वाट निवडली आहे.
इतर महत्वाची बातमी: