सोलापूर (पंढरपूर) : मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाली आहे. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ महाराज यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासा साठी उभारलेल्या 65 एकर येथील भक्तिसागर येथे पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली .
यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. यामुळे 1 लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे . यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात थेट बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी हा समर्थक देत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची गाडी जळाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणाऱ्या सीसी टीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चर्चेत आले होते. अजय महाराज बारस्कर यांची गाडी पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 65 एकर येथील पार्किंगमध्ये अजय महाराज बारस्कर यांची गाडी जळाली. अजय महाराज बारस्कर यांची गाडी पार्किंगमध्ये जळाल्याच्या घटनेचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल. बारस्कर यांची गाडी जळाली की जाळण्यात आली याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
बारस्कर यांनी दोन दिवासपूर्वी पंढरपूरात येण्या आधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. पंढरपूर मध्ये ये तुला मारतो जाळतो अशा धमक्या येत असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी बारस्कर यांनी सोशल मिडीयावर शेअर केला होता. बारस्कर यांनी सोशल मीडियावर पोस्टवर करत पंढरपूरला येणार असल्याचं म्हटलं होतं.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :