Jalna News: मराठा आराक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली असून पुढील दौरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहे. यासाठी आज पूर्वनियोजन बैठक अंतरवाली सराटीमध्ये (Antarvali Sarati) बोलावण्यात आली असून 12 वाजता या बैठकीला सुरवात होणार आहे , या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील काही समन्वयक हजेरी लावणार आहेत.
२० तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.
मराठावाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात कडाडणार मराठा रॅली
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली घेण्यात आल्यानंतर मराठा आरक्षण शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे. यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पूर्वनियोजन बैठक बोलवली असून अंतरवाली सराटीमध्ये १२ वाजता पश्चिम महाराष्ट्रातील काही समन्वयक हजेरी लावणार आहेत.
रॅलीच्या नियोजनावर आज चर्चा
दरम्यान, सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केली नसून यावेळी कडक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी यापूर्वी दिला होता. २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली होती. आता शांतता रॅलीचा पुढचा टप्पा ठरवण्यासाठी पूर्वनियोजन बैठक बोलवण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रात कुठे कुठे शांतता रॅली होणार? कसे नियोजन असणार यावर पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकांसोबत आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे चर्चा करणार आहेत.
मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता. आता, 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, ते उपोषण कठोर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले. तसेच, मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय, असे म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा:
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले