Sharad Pawar : सध्या मी कुठंच नाही, पण तुम्ही काळजी करु नका... मी सगळीकडे आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुगली टाकली. पवारांच्या या गुगलीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माढा (Madha) तालुक्यातील कापसेवाडीत कृषी निष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी  शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न हे राज्य आणि केंद्र सरकारशी संबधीत आहेत. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारशी बोलणार असल्याचे पवार म्हणाले. 


शेतकऱ्यांनी सांगितलेले सर्व प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडील आहेत. सध्या मी कुठेच सत्तेत नाही. पण तुम्ही काळजी करु नका, मी कुठेही बसलो तरी सगळीकडे आहे अशी गुगली शरद पवारांनी टाकल्यामुळं चर्चेला पुन्हा तोंड फुटणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीमुळे काँग्रेस आणि शिवसेना संभ्रमात असताना आज कापसेवाडीत शेतकरी मेळाव्यात बोलताना आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे असल्याचे शरद पवार म्हणाले. 


पंतप्रधान मोदींसह मंत्री शाह यांच्यावरही निशाणा


आपल्याला शेतीतील काय कळते असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि मंत्री अमित शाहा यांच्याव देखील शरद पवार यांनी टाका केली. जनतेनं त्यांच्या उमेदवाराचा पराभव करुन पवारांना शेतीतील किती कळते हे दाखवून दिल्याचा टोला शरद पवारांनी लगावला. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार बबनदादा शिंदे यांचेही नाव न घेता शरद पवारांनी इशारा दिला. शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे उचलणारे आणि दबाव टाकणाऱ्यांची सर्व कागदपत्रे मला द्या, मी त्यांचा पुरता बंदोबस्त करतो अशा कडक शब्दात शरद पवारांनी कारखानदारांना इशारा दिला. शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे उचलणाऱ्यांना नेता म्हणण्याच्या कोणताही अधिकार नसल्याचे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी आमदार बबनदाद शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी केलं पाहिजे


आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मी देशाचा कृषीमंत्री असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. विशेषत यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या झाल्या होत्या. शेतीमालाचे दर घसरले, कर्जाचे व्याज वाढले म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. याबाबत मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले. त्यानंतर मनमोहन सिंग आणि मी यवतमाळला आल्याचे शरद पवारांनी सांगितले. या देशातील उद्योपतींनी कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतात आणि थकवतात त्यांना कधी काही केलं जात नाही. शेतकऱ्यांच्या मागे मात्र तगादा लावला जातो, हे सुत्र बदललं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी केलं पाहिजे. त्यानंतर आम्ही देशात 67 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचे शरद पवारांनी सांगितले.   


महत्त्वाच्या बातम्या:


मराठा आरक्षण मिळेल का?, शरद पवार म्हणतात माहित नाही; पण केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा...