Ujani Dam News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्या तरीदेखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या उजनी धरणात (Ujani Dam) देखील मोठ्या प्रमाणातक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं भीमा व नीरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


वीर धरणातून विसर्ग वाढवला


सध्या मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले आहेत. वीर धरणातून 63 हजार 273 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy Rain) पडत आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं उजनीसह (Ujani) वीर धरणात (Veer Dam) येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळं उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्यानं भीमा नदीसह नीरा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता 


प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेले अंदाजानुसार मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहणार आहे. परभणीत पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.


तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार


मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (रविवारी) सकाळी 5 वाजून 51 मिनीटांनी वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आहे. या एका दरवाजातून 1480 क्यूसेक्स व वीज गृहातून 1500 क्यूसेक्स असा एकूण 2980 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.


महत्वाच्या बातम्या:


पुण्यासह साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, उजनीसह वीर धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा