सिंधुदुर्ग : आंबोलीत (Amboli) वर्षा पर्यटनासाठी (Monsoon Tourism) गेलेल्या युवकाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कुडाळमधील सिद्धेश गोसावी (Siddhesh Gosavi) या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. कावळेसाद पर्यटन स्थळावरून येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या चार चाकी गाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. 


एकाचा मृत्यू, एक जखमी


अपघातात सिद्धेश गोसावी याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी अक्षय म्हाडगूत हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट 


दरम्यान, रायगड जिल्ह्याला काल आणि आज ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे, त्यानंतर रायगड जिल्ह्यात काही भागात कालपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. आज देखील पहाटे पासून रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. तर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना असून मुरूड, अलिबाग, रोहा, माणगाव तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय. रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीने आपली इशारा पातळी ओलांडली असून किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने भात शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Gondia News : अनियंत्रित कार थेट खोल पाण्यात कोसळली; एकाने अशी काही शक्कल लढवली की तिघं थोडक्यात बचावले 


नसतं साहस जीवावर बेतलं! डोळ्यादेखत चिमुकला पुरात वाहत गेला; दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद, शोधकार्य सुरू