Nitesh Rane : माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार आलेले आहेत. मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तकं वाचतो, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे. कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. तर दुसरीकडे त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.    


नितेश राणे म्हणाले की, माझ्यावर संघाचे विचार व संस्कार आहेत. मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तकं वाचतो. त्यामुळे मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही. तुम्हाला नितेश राणे नको असेल, तर त्याच्यासमोर तुमचा पर्याय उभा करा, असे त्यांनी म्हटले आहे.


उद्धव ठाकरे किती मोठे गद्दार हे जनतेने पाहिलंय


नितेश राणे यांनी एकीकडे कोणावर टीका करणार नाही असे म्हटले. मात्र त्याच पत्रकार परिषदेतून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. नितेश राणे म्हणाले की, दुसऱ्यांना गद्धार म्हणवतात मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किती मोठे गद्दार आहे हे जनतेने पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपासोबत (BJP) परत युती करण्यासाठी किती आतुर आहात. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


बाळासाहेबांच्या रुद्राक्षाची किंमत तरी माहित आहे का?


बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदी साहेबांना चांगली माहीत आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या रुद्राक्षाची किंमत तरी माहित आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. कुठल्या तोंडाने जाहीर सभेत भाजपा आणि मोदींवर टीका करत आहात. इंडिया आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  


भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंची नकळत इज्जत काढली


भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याबाबत नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची नकळत इज्जत काढत होते. कार्यकर्त्याची हिंमत होता कामा नये एकेरी नाव घ्यायची. भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केलेला व्हिडिओ दाखवला. उद्धव ठाकरेंवर केलेली टीका याचे व्हिडिओ दाखवले. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं लागतात, असा टोला नितेश राणेंनी लगावला. कालची सभा ही विनायक राऊतांच्या निरोपाची सभा होती. ही विनायक राऊतांची शेवटची निवडणूक आहे, असेही त्यांनी म्हटले.


आणखी वाचा 


Uddhav Thackeray : ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोर म्हणतो; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका