बीड: शेतकरी संपाने महाराष्ट्र ढवळून निघाला असताना, तिकडे बीडमध्ये आता महिला शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवसेनेनेही संपात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज चक्क मुंडन करुन सरकारचा निषेध केला, आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं.
महिला आघाडीच्या अॅड संगीता चव्हाण आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी डोक्यावरचे केस काढून मुंडन केलं.
यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.