- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६ - २०१७ मध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्याकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रति क्विंटल १० रुपये भरडाई दराव्यतिरिक्त प्रति क्विंटल ३० रुपये वाढीव भरडाई दर राज्य शासनाकडून मंजूर.
- राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील दंतशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक, दंतशल्यचिकित्सक या पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास मंजुरी
- राज्याचे महाअधिवक्ता या पदावर आशुतोष कुंभकोणी यांच्या नियुक्तीची राज्यपालांना शिफारस करण्यास मान्यता.
- उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांसाठी उमरेड (जि. नागपूर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यास मान्यता