Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. एप्रिल किंवा मे मध्ये वाघनखं महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातचं ही वाघनखं (Wagh Nakhe) महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा, मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला होता. तर जानेवारीमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु असल्याने याला विलंब झालाय. आता एप्रिल किंवा मे महिन्यात वाघनखांचा मुहूर्त ठरलाय. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा राज्यसरकारचा मानस आहे.
वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात
शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) 15 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाच्या वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरण करण्यासाठी बळ मिळालं होतं. दरम्यान, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार होते.
राज्य सरकारकडून शिवप्रेमींची दिशाभूल, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा दावा
इतिहासकार इंद्रजीत सावंत (Historian Indrajeet Savant) यांनी ती वाघनखं शिवरायांची नाहीत, असा दावा केला होता. सावंत यांनी म्हटल्यानुसार, 'शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरलं ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण आता जी वाघनखं आणली जात आहेत, ती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत. जर 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यात होती, अशा नोंदी आहेत. तर मग 1919 च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवरायांचं असू शकत नाही.'
शिवरायांची वाघनखं निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात आणणार?
काँग्रेस पक्षाला आजवर ही वाघनखं महाराष्ट्रात आणता आली नाहीत. भाजप सरकार निवडणुकीच्या तोंडावर ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणुकीत याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार का? पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
वाघनखं महाराष्ट्रात आणण्यामागे भाजपचा मनसुबा काय?
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं हा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा विषय असू शकत नाही. जर एखाद्याच्या मनात वाघनखांबाबत संशय होता तर भेटून सांगता आलं असतं असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील साऱ्या शिवभक्तांसाठी आस्था आणि अस्मिता असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. वाघनखं हा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा विषय असू शकत नाही, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या?