Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगर येथील मंगलमूर्ती ज्वेलर्सवर दरोडा

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगर येथील मंगलमूर्ती ज्वेलर्सवर दरोडा  छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अशी घटना घडलीय ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतोय. छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज महानगर भागातील रांजणगावच्या मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये ८ ऑगस्टला जबरी चोरी झाली होती. चाकू घेतलेल्या तीन चोरांनी दुकानात बसलेल्या मुकुंद बेद्रे यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर दुकानातील 85 तोळे सोनं 3 किलो चांदी आणि रोख १५ हजार रुपये असा ऐवज लुटला. या प्रकरणात पोलिसांनी 20 तोळे सोनं चोरीला गेल्याची तक्रार घेतली आणि पुरवणीमध्ये वाढीव सोनं घेऊ, असं म्हटलं होतं. तेव्हापासून कालपर्यंत बेद्रे ते सातत्याने पोलीस ठाण्यात 85 तोळ्याच्या जीएसटीच्या पावत्या आणि त्यांची पुरवणी तक्रार घेऊन जातायत. त्यातच काल क्राईम ब्रँचने या प्रकरणातील तीन आरोपी पकडून त्यांच्याकडून 100 टक्के रिकव्हरी केल्याचा दावा केलाय. मग 65 तोळे सोनं आहे कुठे? पोलिसांनी म्हणतात आम्ही 24 तोळं सोनं जप्त केलंय, मग चार तोळं सोनं कुणाचं आहे? एवढंच नाही तर चोर पकडायला आलेल्या दोन लाखांचा खर्च पोलिसांनी बेद्रे यांच्याकडे मागितल्याचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram