Handa Morcha in Karad : सध्या राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळं अनेक ठिकाणी पाण्याची समस्या देखील निर्माण होत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोयना नदीकाठच्या सुपने गावात देखील पाण्याची समस्या निर्माम झाली आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती झाली आहे. ग्रामपंचायत स्थापन होऊन 70 वर्षे उलटली तरी पाणी नसल्याचे ग्रमास्थांनी सांगितलं.
गावात तब्बल 1 कोटी 98 लाख रुपये खर्चून शासनाची जलजीवन योजना राबवली तरी पाणी नाही
कोयना नदीकाठी असलेल्या सुपने या गावातील लोकांना पाणी मिळत नसल्याने हंडा मोर्चा काढण्यात आला. गावात तब्बल 1 कोटी 98 लाख रुपये खर्चून शासनाची जलजीवन योजना राबवली तरी गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने हंडा वाजवत महिला व मुलांसह ग्रामपंचायतीवर मोर्चा नेण्यात आला. नदी उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती सुपने गावकऱ्यांची दिसून येत आहे. अपने ग्रामपंचायत स्थापन होऊन 70 वर्षे उलटली तरी नदीकाठी असलेल्या सुपने गावआला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील सुपने गावात जलजीवन योजना राबवलेली असताना केवळ राजकीय कारणाने आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईला सामोर जावं लागत आहे
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या (Water Crisis) झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. वाड्या - वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळते. शेती पिके पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता आहे . शेतीपिकांची लागवड होते मात्र पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. यंदा तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील लोकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पाणी टंचाईच्या मुद्यावरुन नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. आमच्या भागात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अनेक ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: