Satara Crime : सातारा जिल्हा अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांडाने हादरला आहे. अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून नंतर तिच्या दोन कोवळ्या मुलांनाही विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्याची भयंकर घटना घडली आहे.  ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग या गावात घडली. तिहेरी हत्याकांड करून फरार झालेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


दरम्यान , मिळालेल्या माहितीनुसार योगिता हुंडे, मुलगा समीर व मुलगी तनू अशी खून झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी या तिघांच्या हत्येप्रकरणी दत्ता नारायण नामदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचे बोलले जात आहे.


संशयित दत्ता नामदास हा तिची प्रेयसी योगिता आणि तिच्या मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता. खोली बराच न उघडल्याने ग्रामस्थाना संशय आला. त्यामुळे खोली उघडून पाहिल्यानंतर योगिताचा मृतदेह दिसून आला. ग्रामस्थांनी तातडीने रहिमतपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक चौकशी केली असता दत्ता त्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी चौकशी त्याला अकलूजमधील कामेगावमधून उचलल्यानंतर त्याने मुलांच्याही खुनाची कबूली दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या