Dada Bhuse in Kolhapur : राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व सरी कोसळल्यानंतर राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, आता मोसमी पाऊस हुलकावणी देत असल्याने झालेली पेरणी संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन केले आहे. दादा भूसे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


तिन्ही पक्षामध्ये कोणतीही धुसफूस नाही


दरम्यान, सध्या सुरु असलेल्या विधानपरिषद निवडणूक रणधुमाळीवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री आज संध्याकाळीच मुंबईत एकत्र जमतील. उद्या एकत्र येण्याचे नियोजन होते. मात्र, आजच मुंबईत सर्वजण दाखल होतील, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 



दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही


राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी म्हणावा तसा पावसाने अजून वेग पकडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, आतापर्यंत राज्यात केवळ दीड टक्के पेरणी झाल्याचे ते म्हणाले. 


सदाभाऊ खोत यांच्या विषयावर बोलण्यास नकार


गुरुवारी, सदाभाऊ खोत यांचा ताफा सोलापुरातील एका हॉटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी हा ताफा अडवला. हा व्हिडिओ राज्यात चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या