Maharashtra SSC 10th result 2022 live : नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

Maharashtra ssc 10th Result 2022 LIVE Updates : दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होईल. विद्यार्थ्यांना marathi.abplive.com वरही निकाल पाहता येणार आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2022 09:50 PM

पार्श्वभूमी

SSC 10th Result 2022 : बारावीच्या (HSC Result 2022) निकालानंतर दहावीचा (SSC Result 2022) निकाल कधी लागणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे....More

SSC Exam : नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

SSC Exam : दहावीत मार्क कमी मिळाले म्हणून नेरळ येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या   केली  आहे. साहिल संभाजी ठोंबरे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. 
नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनखाली  जीव दिला आहे. साहिल हा नेरळ गावचा रहिवासी आहे.  कर्जत रेल्वे पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.