Satara Crieme : कराडमध्ये गजानन हौसिंग सोसायटीत रस्त्याकडेला असलेल्या इमारतीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे.
बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने एक चोराला पकडण्यात यश आले, तर तिघे फरार झाले. यावेळी चोरटे व पोलीस यांच्यात झटापट झाल. याच झटापटीत एकाने पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे फवारल्याने काही पोलिस जखमी झाले. जखमींना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले.
जिलेटिनच्या वापराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी एटीएमबाहेर संशयास्पद वायर, एटीएम मशीनमधे अडकवलेले डिटोनेटर यासह परिस्थिती पाहता एटीएम मशीन स्फोटाने उडवून देण्याचा कट होता हे स्पष्ट आहे. पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, तसेच पकडलेला एक जण पुण्यातील असून एक स्थानिक आहे, उर्वरित दोन दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. आज सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथकाने एटीएम सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले जिलेटिन ब्लास्ट केले. या पथकाने जिलेटीनचा त्याच एटीएममध्ये स्फोट केला आणि जिलेटीन निकामी केले. जिलेटीन मोठ्या क्षमतेचे असल्याने मोठा स्फोट झाला त्यामुळे परिसर दणणाला. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, एटीएम मशीनचे नुकसान झाले असून आत असलेल्या रकमेचे नुकसान झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांचं यावेळी नेमकं काय ठरलंय? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पहिल्यांदाच केला स्पष्ट खुलासा!
- Vishalgad Fort Landslide : विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड रणमंडळ टेकडीवर सुरक्षित ठेवले, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांकडून मोहिम फत्ते
- Maharashtra Bus Accident: मध्य प्रदेशातील अपघातात एसटीच्या चालक-वाहकांसह 13 जणांचा मृत्यू, आठ जणांची ओळख पटली
- Maharashtra Bus Accident In MP Live Updates: एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; आतापर्यंत 12 ते 13 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले; अद्यापही 25 प्रवाशी बेपत्ता