Satara News : सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानच्या कबरीभोवतीचे अवैध बांधकाम ( illegal construction around Afzal Khan grave pratapgad) पाडण्याविरुद्धच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी बंद केली आहे. वनजमिनीवरील बेकायदा बांधकाम पाडण्यात आल्याचे सातारा प्रशासनाने न्यायालयाला सांगितले. समाधीचे कोणतेही नुकसान झाले नाही, हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. अफझलखानच्या कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. प्रतापगडावरील अफझलखानच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कबरीजवळ अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं सुरुवात केल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.  


दरम्यान, प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरून हटवण्यात आलं आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली. 


अखेर अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या बांधकामावर हातोडा 


अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून  हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात येत असल्याचा दावा करतही यावरुन अनेकदा वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणाला जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. 


छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. अखेर शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत महसूल विभाग आणि वनविभागाकडून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. 


किती अनधिकृत बांधकाम झालं होतं?



  • कबरीच्या बाजूला 7 खोल्या

  • कबरीसमोर हॉल

  • मुजावरांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था

  • आठ गुंठ्यात अनधिकृत बांधकाम


या अनधिकृत बांधकामावरुन अनेकदा वादही झाला आणि अखेर यावर हातोडा पडला. या कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या