सातारा : सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही, असा विश्वास देण्याचा प्रयत्न कराडमधून केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपचा 400 पाचा नारा, हा देशाचे संविधान बदलण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप इंडिया आघाडीकडून तसेच देशातील विविध सामाजिक संघटनांकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी यांनी संविधानाचा मुद्दा उपस्थित करत मी  जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही, असा ग्वाही दिली. 



आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत, कधी माझा आवाज, कधी अमित भाईंचा आवाज


दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्याचे सांगत त्या ठिकाणी बाबासाहेबांचे संविधान त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलं नाही. त्या ठिकाणी असलेल्या दलित, आदिवासी समाजाला त्याचा लाभ घेऊ दिला नाही, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. मोदी यांनी सभेमध्ये बोलताना बोलताना फेक व्हिडिओवरून सुद्धा विरोधकांवर टीका केली. आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत, कधी माझा आवाज, कधी अमित भाईंचा आवाज तर कधी नड्डांचा आवाजामध्ये व्हिडिओ पसरवत जात असल्याची टीका त्यांनी केली. हे व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पसरवले जात आहेत. त्याला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


अशा संदर्भातील व्हिडिओ व्हाॅटसअपवर फॉरवर्ड करताना विचार करा, असे व्हिडिओ आपल्यासमोर आल्यास लिसांना माहिती द्यावी, असे ते म्हणाले. या संदर्भात निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची दखल घ्यावी असे ते म्हणाले. देशामध्ये वातावरण बिघडण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या