Shriniwas Patil Wife : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.12) सायंकाळी 6 वा. कराड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil)  यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकांमध्ये रजनीदेवी पाटील नेहमी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 


कोण आहेत श्रीनिवास पाटील? 


खासदार श्रीनिवास पाटील सनदी अधिकारी होते. त्यापूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मैत्री होती. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकारणात आणले. अधिकारी असताना पवार यांनी त्यांना राजीनामा देत निवडणुक लढवण्यासाठी सांगितले. अशा प्रकारे श्रीनिवास पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला. श्रीनिवास पाटील 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 अशा 2 टर्म खासदार होते. त्यानंतर पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.


भर पावसात शरद पवार उदयनराजेंवर बरसले 


महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली. अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून जात असताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच साताऱ्याच्या लोकसभेची पोटनिवडणुक निवडणूक लावण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील मैदानात होते. शरद पवार भर पावसात उदनयराजेंवर बरसले. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयराजेंचा मोठा पराभव केला. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मैत्री 


श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांच्या मैत्रीच्या अनेक कथा सध्या महाराष्ट्रात ऐकायला मिळतात. मित्रासाठी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा ते निवडणुकीत शरद पवार पावसात भिजले. यामुळे श्रीनिवास पाटील चांगलेच चर्चेत आले होते. श्रीनिवास पाटील यांची राज्यपाल म्हणून नेमणूक करावी, या मागणीसाठी शरद पवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे देखील गेले होते. सध्या साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांचा तगडा जनसंपर्क होता. शिवाय, त्यांच्या मोठा प्रशासकीय अनुभव देखील होता. त्यामुळेच त्यांना 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती, असे शरद पवार म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Aaditya Thackeray : हा निर्लज्जपणाचा कळस, आम्ही कायदेशीर लढाई लढणार, राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया