सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात (Satara Ganesh Darshan) गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली. सातारा शहरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगचेंगरी होऊन एक तरुण जखमी झाला. चेंगराचेंगरीत पायाखाली चिरडल्याने गुदमरून तो बेशुद्ध पडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  (Satara Police) त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढल्याने जीव वाचला. 


मोती चौक परिसरातील घटना


दुसरीकडे, साताऱ्यातत विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. काल (ता. 28 सप्टेंबर) गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजपथावरील मोती चौक परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये अनेकांची दमछाक झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीने गर्दीतील एक तरुण गुदमरून बेशुद्ध झाला. ही घटना निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी बाजूला करून तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.


इतर महत्वाच्या बातम्या