सातारा : शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी साताऱ्यात (Satara News)  केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम (Madan Kadam)  यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, आरोपी मदन कदम हा ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मदन कदम हा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण


गोळीबारावेळी आरोपी मदनसह त्याची दोन मुले सोबत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मदन कदम यांच्या गुरेघर येथील फार्महाऊसवर घडली. मृत व्यक्ती  या गुरेघर पासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावातील आहेत. चार दिवसापूर्वी किरकोळ कारणातून मदन कदम आणि कोरडेवाडी गावातील लोकांसोबत वाद झाला होता.  श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यासह काही ग्रामसौथ मदन यांना जब विचारण्यासाठी गेले आसता मदन याने बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात सुमारे दोन तास पडले होते. पोलिसांनी येऊन हे मृतदेह ताब्यात घेतले.  गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नातेवाईकांकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 


राज्यात मोगलाई आहे का? अजित पवारांचा सवाल


विधानसभेत देखील अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला.  मदन कदम यांनी काल गोळीबार केला यात दोघांचा मृत्यू झाला तीसरा व्यक्ती ही अतिशय गंभीर आहे. शंभुराजे देसाई हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कदम हे ठाणे येथील माजी नगरसेवक आहे.  एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मुलाचा अपघात झाला म्हणून गोळीबार करावा ही काय मोगलाई आहे का?  असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. 


कोण आहे मदन कदम?


मदन कदम हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत मात्र त्यांना सेनेने तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या :