माण (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात (Satara Crime) खुनांची मालिका सुरुच असून आता सख्ख्या चुलत भावाने भाऊ आणि भावजयचा (Double Murder in Satara) कुऱ्हाडीने घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना माण तालुक्यातील आंधळीत ही घटना घडली. संजय रामचंद्र पवार (वय 49) व मनीषा संजय पवार (वय 45) असे या दाम्पत्याचे नाव आहे. शनिवारी रात्री शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच सख्ख्या चुलत भावाने केल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या अवघ्या चार तासांमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय 35, रा. आंधळी) असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृत दाम्पत्य आणि आरोपी दादासोचा वाद सुरु होता. संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केल्याने याचा राग दादासो पवारच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी वारंवार तो धमकी देत होता. या वादातून त्याने खून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे मुलाने केलेल्या कृत्यामुळे आई वडिलांना जीव गमवावा लागला आहे.
शेतात कुऱ्हाडीने वार करुन खून
संजय पवार व मनीषा पवार दोघेही शेतात शनिवारी संध्याकाळी पाणी पाजण्यासाठी गेले होते. यावेळी संजय मोटार सुरू करत होते, तर पत्नी मनीषा खत टाकत होत्या. यावेळी दादासो पवारने संजय यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी मनीषा मदतीसाठी धावल्यानंतर दादासोने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने घाव केला. घाव वर्मी बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. पवार दाम्पत्य घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी शेतात पाहणी केली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडले होते. पोलिस पाटलांनी दहिवडी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात खून दादासोने केल्याचे समजले.
पोलिसांनी वाटेतच मुसक्या आवळल्या
दादासो खून करून पुण्याला (Satara Crime) कारने पळाला होता. तेथून पुन्हा फलटणमार्गे घरी येत असताना पोलिसांनी त्याला वाटेतच पकडले. यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. मृत संजय पवार यांच्या पश्चात आई, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी तसेच एक मुलगा आणि भाऊ आहे.
इतर महत्वाच्या बातम्या