सातारा : सह्याद्रीच्या पर्वतरांगा... या पर्वतरांगा म्हणजे एक स्वर्गच आणि याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एका ठिकाणाला मिनी कश्मीर म्हणून ओळखले जाते ते म्हणजे महाबळेश्वर. याच महाबळेश्वरच्या धरतीवर आता प्रशासकीय यंत्रणा नव्याने आणखी एख नवीन महाबळेश्वर प्रकल्प (Satara New Mahabaleshwar Project) तयार करत आहे. 


खरंतर या प्रकल्पात समाविष्ट केलेली गावे ही अतिदुर्गम भाग म्हणून ओळखली जाणारी. या अतिदुर्गम भागाशी प्रशासकीय यंत्रणेकडून कनेक्टिव्हिटी वेगळ्या पद्धतीने जोडली जात आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गावांमध्ये आज एक वेगळं आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. अनेक जण या प्रकल्पात अनभिन्न आहेत. याच अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने टप्प्याटप्प्याने त्या त्या गावातून सूचना मागून घेतलेल्या आहेत. 


स्थानिक ग्रामस्थांना त्रास होईल असा प्रकल्प नको


याच अनुषंगाने महाबळेश्वरातील पंचायत समितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीवेळी सर्वांनी मत व्यक्त केलं. छोट्या छोट्या गावातील ग्रामस्थांना त्रास होईल असं कोणताही प्रकल्प राबवू नये. जर स्थानिकांच्या जमिनी आरक्षित न घेता जर तुम्ही प्रकल्प राबवणार असाल तरच हा प्रकल्प राबवा असे मत व्यक्त करण्यात आले.


या बैठकीवेळी अनेक स्थानिक ग्रामस्थांनी आपापली मतं मांडली. या मतांमध्ये अगोदरच कोयना धरण बांधत असताना प्रशासकीय यंत्रणेने गोड बोलून धरणासाठी जमिनी काढून घेतल्या. मात्र त्याचा मोबदला आजपर्यंत दिला नाही. अशाच पद्धतीचा हा प्रकल्प आहे का ? असा सवाल काही जणांनी विचारला. 


रस्ते विकास महामंडळ हा प्रकल्प कसा काय राबवत आहे असा प्रश्न उपस्थित करत या प्रकल्पाबाबतची लेखी स्वरूपात माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि नंतर हरकती घ्याव्यात असं परखड मत माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी या बैठकीत मांडलं. 


या प्रकल्पात नेमकं आहे तरी काय ?


- या प्रकल्पाला नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र असं नाव देण्यात आलेला आहे.
- या प्रकल्पात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील 214 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
- ही सर्व गाव कोयना जलाशया बरोबर कन्हेर धरण, उरमोडी प्रकल्पच्या परिसरातील आहेत.
- सुरुवातीला या प्रकल्पामध्ये 58 गावे समाविष्ट करण्यात आली होती. नंतर याचा विस्तार वाढवून त्यामध्ये 177 गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये जवळपास 900 चौरस किलोमीटरचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले.
- या प्रकल्पात जावळी तालुक्यातील 46 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर पाटण तालुक्यातील 95 गावांचा, सातारा तालुक्यातील 34 गावांचा, महाबळेश्वर तालुक्यातील 60 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.


ही बातमी वाचा: