Almatti Dam कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सव्वा लाखावरून दीड लाख क्युसेक्स करण्यात आला असून या तिन्ही जिल्ह्यांना पुराच्या धोक्यापासून दिलासा मिळणार आहे. पंचगंगा कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातील विसर्ग सातत्याने वाढवला जातोय.


कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु, कोल्हापूरसह सांगली, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा मिळणार आहे.अलमट्टी धरणातून सध्या 80 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत होता तो आता वाढवण्यात आला आहे. त्यामुळं सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे.


मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते काल निवेदन


सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्हांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेकचा विसर्ग वाढवण्याची मागणी काल कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. 


अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 81 टक्क्यांवर


यंदा चांगला पाऊस झाल्याने अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 81 टक्के झाली आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा तातडीने कमी करण्यात यावा अशी मागणी कृष्णा नदी पूर नियंत्रण समिती व सांगलीतील आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी केली होती. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु, कोल्हापूरसह सांगली, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा मिळणार आहे.अलमट्टी धरणातून सध्या 80 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत होता तो आता वाढवण्यात आला आहे. त्यामुळं सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे.


नद्यांची पाणी पातळी वाढतेय


कोल्हापूर सांगली साताऱ्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीपात्रा बाहेर जात असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार या दोघांच्या समन्वयातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सव्वा लाख वरून दीड लाख क्यू सेक्स विसर्ग करण्यात येणार असल्याने सांगली सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा धोका कमी झालाय.


हेही वाचा:


कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु, कोल्हापूरसह सांगली, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा