Maharashtra NCP Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झालाय. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले. राष्ट्रवादीचा पक्ष शरद पवार आणि  अजित पवार या काका-पुतण्यामध्ये विभागला गेल्याचं स्पष्ट झाले. बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे समोर आलेय. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे कोण कोणते आमदार आणि खासदार आहेत, याबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. पाहूयात कोणत्या आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला आहे... 

अजित पवारांसोबत असलेले आमदार 1. छगन भुजबळ  2. दिलीप वळसे पाटील  3. हसन मुश्रीफ  4. धनंजय मुंडे  5. आदिती तटकरे  6. संजय बनसोडे  7. अनिल पाटील  8.धर्मरावबाबा आत्राम 9.किरण लहमाटे10. निलेश लंके11. दिलीप मोहिते12. मकरंद पाटील13. अतुल बेनके14. सुनिल टिंगरे15. इंद्रनील नाईक16. अशोक पवार17. अण्णा बनसोडे18. सरोज अहिरे29. बबनदादा शिंदे20. यशवंत माने21. नरहरी झिरवळ22. दत्ता भरणे23. शेखर निकम24. दीपक चव्हाण25. राजेंद्र कारेमोरे26. नितीन पवार27. मनोहर चंद्रिकापुरे28. संग्राम जगताप29. राजेश पाटील30. सुनील शेळके 

विधानपरिषदेचे आमदार कोणते ?

1. रामराजे निंबाळकर2. अमोल मिटकरी3. शशिकांत शिंदे4. अनिकेत तटकरे5. विक्रम काळे6. सतिश चव्हाण

अजित पवारांसोबत खासदार कोणते ?

1. सुनिल तटकरे2. अमोल कोल्हे 3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

शरद पवारांसोबत कोणते आमदार ?

1. जयंत पाटील2. जितेंद्र आव्हाड3. रोहित पवार4.राजेश टोपे5.प्राजक्त तनपुरे6.अनिल देशमुख7. सुनिल भुसारा8. सुमनताई पाटील09. संदीप क्षीरसागर10. बाळासाहेब पाटील11. चेतन तुपे12. मानसिंगराव नाईक13. दौलत दरोडा

पवारांसोबत खासदार कोणते ?

1.सुप्रिया सुळे2. श्रीनिवास पाटील3. वंदना चव्हाण (राज्यसभा)4. फौजिया खान (राज्यसभा)

विधानपरिषद आमदार कोणते ?1.अरुण अण्णा लाड2. एकनाथ खडसे3. बाबाजानी दुर्राणी

यांची भूमिका अद्याप अस्पष्ट -

नवाब मलिकप्रकाश सोळंखेबाळासाहेब आजबेआशुतोष काळेदिलीप बनकरमाणिकराव कोकाटेचंद्रकांत नवघरेराजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)