Gautami Patil : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतचं साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. 


साताऱ्याच्या (Satara) खोजेवाडी या गावातील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी गावच्या पारावर थेट नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान चिमुकल्याच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्यायला आणि गौतमीचा शो पाहायला पंचक्रोषीतील मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती. 



साताऱ्यात बड्डेबॉयची वेगळी क्रेज दाखवण्यासाठी खास गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साताऱ्यातील खोजेवाडी या गावातील चेतन शिंदे यांच्या पाच वर्षाच्या मुलचा मल्हारचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


गौतमीच्या साताऱ्यातील कार्यक्रमाला चाहत्यांची झुंबड उडाली होती. गौतमीच्या इतर कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात मात्र फरक होता. तिच्या या कार्यक्रमाला महिलांचीही उपस्थिती होती. बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला अश्लिल नृत्य न करण्यास सांगितले होते. त्यामुळेच गौतमीच्या या कार्यक्रमात तुफान राडा झाला नाही. 


साताऱ्याआधी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तुफान राडा झाला असून आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यामुळे तिचा हा कार्यक्रम आयोजकांनी ओटोपता घ्यावा लागला. प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी आयोजकांनी 60 बाऊन्सरस ठेवले होते.


गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात


नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस गौतमीची लोकप्रियता वाढत आहे. लवकरच तिचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 



संबंधित बातम्या


Ruckus in Gautami Patil Event : नगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण; पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज