सातारा : उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी राज्याचे अवघं मंत्रिमंडळ रविवारी (28 जानेवारी) साताऱ्यात दाखल झाले होते. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आमनेसामने आले, पण उभय नेत्यांमध्ये हाय हॅलो सुद्धा झालं नाही. यानंतर आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी तसेच वेळ पडल्यास अधिकाऱ्यांना सुद्धा फैलावर घेण्यास प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी सातारमध्ये शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहाला उपस्थिती लावल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी शासकीय विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाने भलताच प्रसंग घडला. त्यामुळे अधिकाऱ्याची पाचावर धारण बसली.  


नेमका प्रसंग काय घडला?


शासकीय विश्रामगृहावर अजित पवार विकासकामांचा आढावा घेत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना  भेटण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळी एका कार्यकर्त्याने अजित पवारांकडे शासकीय विश्रामगृहात पिण्यासाठी पाणी देत नसल्याची तक्रार केली. या प्रसंगानंतर संतापलेल्या अजित पवार यांनी अधिकाऱ्याला फैलावर चांगलाच दम भरला. परत तो संबंधित कर्मचारी या ठिकाणी दिसला, तर तुम्ही दिसणार नाही, असा सज्जड दम भरला. यानंतर अधिकाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. 


मी याठिकाणी आल्यानंतर सर्व बिले चुकते करतो


संबंधित कार्यकर्त्याने त्या कर्मचाऱ्याकडे पाणी मागितल्यानंतर त्याने साधी बाटली देऊ केली. यानंतर त्याने बिसलेरीची मागणी केल्यानंतर वाद झाल्याने तो कार्यकर्ता थेट अजित पवारांकडे गेला. त्यांनी मी याठिकाणी आल्यानंतर सर्व बिले चुकते करतो, असे सांगत कार्यकर्त्यांना पाणी न दिल्याने नाराजी व्यक्त केली. 


अजित पवारांनी कोल्हापुरात फोन फिरवत झाप झाप झापलं


साताऱ्यात झालेल्या रविवारच्या प्रसंगानंतर आज (29 जानेवारी) भल्या सकाळी क्रीडा अधिकाऱ्यांना कोल्हापुरात अजित पवारांच्या दणक्याचा सामना करावा लागला. कोल्हापूर दौऱ्याव असलेल्या अजित पवारांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केल्याने परिस्थिती पाहण्यासाठी गंगावेस तालमीला भेट दिली. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदर शेखने याच तालमीत सराव केला होता. पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात याचा आढावा अजित पवारांनी घेतला. यावेळी अनुपस्थित असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने तालमीत येण्याची सूचना केली. अजित पवार म्हणाले, अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहे? लवकर शिस्तीत या कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणा-यांना ते नेहमी धारेवर धरत असतात.  


इतर महत्वाच्या बातम्या