आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या कंपनीचे जगभरात कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. यानंतर देशभरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. पण भारत-न्यूझीलंड फायनलनंतर रात्री दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला, असा सनसनाटी दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भारत-न्यूझीलंड फायनलनंतर रात्री काही लोकांनी या देशात दंगली घडवायच्या प्रयत्न केला आहेत. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. तसेच तुमच्या लोकांना आवरा नसता, तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका ठेवला जाईल, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत पत्रकार परिषद म्हणाले, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही काही नग भरले आहेत. कोणताही राजा हा एकधर्मीय राजकारण करु शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पण राज्यात मुस्लिम्स होते, इतिहास समजून घ्यावा आणि मग इतिहासावर बोलावं. इतिहास बदलून टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे. फडणवीसांनी आणि त्यांच्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे द्यावे.
भारत-न्यूझीलंड फायनलनंतर रात्री दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला होता - संजय राऊत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मॅच झाली दुबईमध्ये, येथे काही लोकांनी विजय रॅली काढल्या. आणि विशिष्ट भागात जाऊन दंगल केली. वाद्य वाजवले पाकिस्तान मुर्दाबाद अश्या घोषणा दिल्या. सामना भारत आणि न्यूझीलंडचा होता. पण आपण त्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, हे लोक विशिष्ट राजकीय सरणीचे आहे. भारत जिंकला याचा उत्सव साजरी करा, ना की कोण हरले म्हणून, पण त्यासाठी तुम्ही 'मशिदीसमोर वाद्य वाजवणं, मुस्लिमांना शिव्या देण्याचं कारण काय?' भारत-न्यूझीलंड फायनल मॅचच्या रात्री विशिष्ट लोकांनी पुन्हा एकदा दंगली घडवाण्याचा प्रयत्न केला, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणार पत्र
संजय राऊत पुढे म्हणाले की, मी मोदींना पत्र लिहणार आहे या लोकांना आवरा नाही तर तुमच्यावर दुसर्या फाळणीचा ठपका येईल. या देशात पुन्हा एकदा फाळणीची बीजे रोवण्याचे काम मोदींची पिलावळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा -