Astrology Panchang Yog 12 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 मार्च म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आज फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. तसेच, आज बुध ग्रहाचं अधिपत्य असणार आहे. त्यामुळे मीन राशीत राजयोग (Yog) जुळून येणार आहे. तसेच, आजच्या दिवशी गजकेसरी योगासह अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. आजचा दिवस काही राशींसाठी फार शुभ ठरणार आहे. या राशींना नशिबाची चांगली साथ मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. तसेच, कुटुंबातील लोकांची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, जे परदेशात काम करतायत त्यांना चांगला नफा मिळेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा चांगला विकास झालेला दिसेल. व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अप्रात्यक्षिकपणे धनलाभ मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. एकमेकांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, कौटुबिंक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला अनुभव मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मेहनतीचा असणार आहे. आज काही अनोळखी लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाचं समाधान मिळेल. तसेच, तुम्हाला काही अनुभवी लोकांचं मार्गदर्शन मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामातून सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे रखडलेले पैसे लवकरच तुम्हाला मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: