Sangli : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आम्ही सत्तेत येऊ असं वाटत नव्हतं, पण  बरं झालं, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अंगात आलं; अन् तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं असे म्हणत काँग्रेस नेते, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांनी सत्ता स्थापनेचा किस्सा सांगितला. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या व्यग्र कार्यक्रमातून उशीरा का होईना, पण मंगळवारी रात्री आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल अडीच तास वेळ दिला. यावेळी आमणापूर ग्रामस्थांना संबोधित करताना राज्यमंत्री चांगलेच मुडमध्ये बॅटिंग करताना पहायला मिळाले. 


खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले असे म्हणत राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडी सत्तास्थापनेचे गुपित उलघडले. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंगळवारी रात्री आमणापूर गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तब्बल अडीच तास वेळ दिला. बोरजाईनगर, श्रीराम मळा, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केले.


आम्ही निवडून आलो, विरोधी बाकांवर बसावे लागणार होते. मात्र खासदर संजय राऊत यांच्या अंगात आले. एकत्र येणारच नाहीत असे पक्ष एकत्र आले, आणि राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आली असे कदम म्हणाले.


कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच अजून पोळ्या खायच्या राहिल्याचे सांगितले. एवढा उशीर होईल माहिती असते, तर दिवसही वेगळा निवडला असता आणि दहा बारा बोकड असे राज्यमंत्री म्हणताच उपस्थितांनी मनापासून हसून दाद दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या