सांगली : विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि राहतील, ते देशाचे आणि काँग्रेसचे भविष्य असून त्यांच्यावर झालेली टीका सामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही, असा टोला सांगलीमधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला. विश्वजीत कदम यांना निष्कारण बदनाम आणि घेरण्याचा करण्याचा प्रयत्न झाल्याची टीकाही त्यांनी केली. 


निकालाचा काहीही संबंध नाही ते वाघ आहेत आणि राहतील


विशाल पाटील म्हणाले की, संजय राऊत टीका का टीका करत आहेत माहीत नाही. विश्वजित कदम सांगलीचे वाघ आहेतच, पण राज्याचे वाघ होताना दिसतील. त्यांच्याकडे प्रभावी नेतृत्व असून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. ते आघाडी धर्म पाळणार हे निश्चित आहे, पण लोकांनी निवडणूक हातात घेतली असल्याचे विशाल पाटील म्हणाले. निकालाचा काहीही संबंध नाही ते वाघ आहेत आणि राहतील, त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे त्यांनी सांगून देखील लोक त्यांच्या म्हणण्याविरुद्ध लोक जाताना दिसत असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 


माझं वारं होतंच ते आता वादळ झालं 


विशाल पाटील म्हणाले की, माझं वारं होतंच ते आता वादळ झालं आहे. दोन्ही विरोधी पक्षाचे उमेदवार एकमेकांवर बोलत नाहीत, पण माझ्या विरोधात बोलतात, एवढी माझी का धास्ती घेतली आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. माझे वारं होतंच ते आता वादळ झालं आहे. या निवडणुकीत मला शंभर टक्के यश मिळेल याची खात्री असल्याचे ते म्हणाले. लोकांना बदल हवा असून त्या बदलाचा मी चेहरा असल्याचा दावा त्यांनी केला.


विशाल पाटील भाजपची बी टीम 


दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की,  प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे अपेक्षितपणे प्रचार झाला आहे. विशाल पाटील भाजपची बी टीम आहे मी आधीही सांगितलं होतं आताही सांगतो. प्रकाश आंबेडकर त्यांच्यासाठी मदत करत आहेत का ते कळलं नसल्याचेही ते म्हणाले. 


चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, काहीही असलं तरी विजय आमचाच आहे त्यामुळे खासदार मीच होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. सगळे चांगल्या मनाने माझ्यासोबत काम करत आहेत विश्वजीत कदमही माझ्यासाठी मेहनत करत आहेत. आज शेवटची सभा म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. विश्वजीत कदम सुद्धा असतील. विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यासारखे साखर कारखाने मी बुडवले नाहीत, माझ्यापुढे दोघांचेही आव्हान नसल्याचा दावा त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या