Vishal Patil : सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघात माझ्या बाजूनं वार निश्चितपणे फिरलंय. या वाऱ्याचं आता वादळ झालं आहे. त्यामुळं लोक आता भाजपच्या (BJP) सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार असल्याचा विश्वास सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी व्यक्त केला. भाजपला पराभव दिसू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेते सांगलीत येऊन अपक्ष उमेदवारावर बोलतात. यातूनच कळते की विरोधकांची पायाखालची वाळू सरकली असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 


काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझे काम करतात


मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारीमुळं मला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत असंही विशाल पाटील म्हणाले. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझे काम करत आहे. माझ्यामागे लाखोंच्या संख्येनं अदृश्य हात आहेत. हे हात कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत असंही विशाल पाटील म्हणाले. विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे अशी लोकांच्या मनात भावना आहे. माझ्या मागे लाखो अदृश्य हात असल्याचे विशाल पाटील म्हणाले.  


विश्वजीत कदम यांचे नेतृत्व शेवटपर्यंत मान्य करणार


आम्ही वसंतदादांच्या विचारांची लोकं आहोत. एकदा निर्णय घेतला की, त्यावर ठाम राहतो असे विशाल पाटील म्हणाले. विश्वजीत कदम हे राज्याचे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे भविष्य आहेत. निकाल काहीही लागो, आम्ही विश्वजीत कदम यांचे नेतृत्व शेवटपर्यंत मान्य करणार आहोत असे विशाल पाटील म्हणाले. अडचणीत असलेल्या सहकारी संस्था चांगल्या करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. 


अदृश्य हात निकालापर्यंत आणि निकानंतरही माझ्यासोबत राहतील


काँग्रेसवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ते नेते मनाने माझ्याबरोबर आहेत. विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे अशी लोकांच्या मनात भावना आहेत. माझ्या मागे लाखो अदृश्य हात आहेत. हे हात निकालापर्यंत आणि निकानंतरही माझ्यासोबत राहतील. सगळेजण ठामपणे उभे राहतील असे विशाल पाटील म्हणाले. माझा जनतेवर विश्वास आहे. जनतेनं ठरवलं आहे. विजय माझा नाही, जनतेच्या उद्रेकाचा विजय होणार आहे. प्रचंड मताधिक्क्यानं माझा विजय होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मी 100 टक्के विजयी होणार असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Sangli Lok Sabha: सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नची तुफान चर्चा; पक्षीय पाश झुगारुन सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार