सांगली : संघर्ष आमच्या नशीबात असेल तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे. उद्या चांगला निर्णय होईल, गुडी उभा करायची आहे. विश्वजित कदम प्रयत्नांमध्ये अपयशी ठरणार नाहीत. श्रद्धा आणि सबुरी यावर आमचे काम चालू असल्याचे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू  ठोकलेल्या विशाल पाटील यांनी म्हटले आहे. सहा दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेनं ज्या पद्धतीने रान उठवलं आहे हे पाहता शिवसेनेचे कौतुक असल्याचे खोचक प्रतिक्रियाही विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विशाल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार?


त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला महाविकास आघाडीमधील वाद आता का टोकाला गेला आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे. सांगलीच्या जागेवर अडून बसलेल्या विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या बंडखोरीचे संकेत दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उद्या गुढी उभा करू असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उद्याच महाविकास आघाडीची जागावाटपसंदर्भातील महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत असतानाच विशाल पाटील आता उद्या नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.  


संजय राऊत यांना सांगलीत ताकद कळली असेल


संजय राऊत यांनी केलेल्या सांगली दौऱ्यावरही विशाल पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, राऊत यांच्या दौऱ्यामागील कारण काय होते? दौरा केल्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यातील स्थिती कळाली असेल. सांगलीमध्ये कोणाची ताकद आहे हे सुद्धा त्यांना कळलं असेल असे विशाल पाटील म्हणाले. सांगलीची जागा काँग्रेसला जाऊ नये यासाठी षड्यंत्र आहे का? अशी विचारणा करण्यात आले असता, ते म्हणाले की हा विचार करण्याचा वेळ नाही. भाजपच्या विरोध करणे हे गरजेचं आहे. 


विशाल पाटील यांनी सांगितले की, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस एकसंधपणे काम करत आहे. काँग्रेस पक्षात सांगली लोकसभा जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवले होते, पण जागावाटपाचा तिढा अनपेक्षित आल्याचे विशाल पाटील म्हणाले. दरम्यान, त्यांनी सांगितले की आम्ही काँग्रेस नेत्यांनी कुठेही आक्रमक वक्तव्य केलेली नाहीत.


वसंतदादांनी त्याकाळी शिवसेनेला मदत केली होती


संजय राऊत यांच्या भूमिकेवरून विशाल पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अशा पद्धतीने बोलणं दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत माध्यमांसमोर येऊन भाजपविरोधात बोलतात ही आम्हाला ऊर्जा देणारी बाब आहे. वसंतदादांनी त्याकाळी शिवसेनेला मदत केली होती. संजय राऊत यांचा आवाज चळवळीचा आवाज आहे. मात्र राऊत यांचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जात असल्याचे ते म्हणाले. 


विश्वजित कदम यांच्यावर संशयास्पद बोलणे चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीमधील नेत्यांवरबोलणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, सांगलीच्या विषयावर बंद खोलीत चर्चा व्हायला हवी होती, असे त्यांनी सांगितले. उद्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल अशा असा विश्वासही विशाल पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या