सांगली :  सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असून ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अखेर आज  सांगली मतदारसंघावरून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी मौन सोडले आहे. संजय राऊतांबद्दल आदर असून त्यांना इथली परिस्थिती कळली असेल.  विश्वजीत कदम अपयशी ठरणार नाही. निर्णय चांगलाच होणार असून सांगलीत उद्या निर्णयाची गुढी उभारणार, असे म्हणत विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. 


विशाल पाटील म्हणाले, जागावाटपाचा तिढा अनपेक्षित आला. आम्हाला कुणाला त्याची अपेक्षा नव्हती. संयम आम्ही पाळला मात्र आज  विश्वजीत कदम जी भावना मांडत होते. सांगली काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि जनतेची होती.   विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ काम करतेय काँग्रेस पक्षच सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता.  सर्वाचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवला होता. मात्र जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे आला आहे. 


गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होणार : विशाल पाटील


 सांगलीचा विषय हा बंद खोलीत चालला पाहिजे होता, गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल. संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्यामागचे कारण काय? राऊत यांनी संगलीचा दौरा केल्यावर त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती कळली असेल. सांगलीत  कोणाची ताकद जास्त आहे हे त्यांना कळले असेलच. मात्र सांगलीची जागा काँग्रेसला जाऊ नये यामागे षडयंत्र आहे का याचा विचार करण्याची आता वेळ नाही. संघर्ष आमच्या नशीबात असेल तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे


 महाविकास आघाडीतील नेत्यांवर राऊत यांनी बोलणे हे दुर्दैवी: विशाल पाटील


संजय राऊत माध्यमासमोर येऊन भाजप विरोधात बोलतायत हे आम्हला ही ऊर्जा देणारी आहे. वसंतदादानी त्यावेळी शिवसेनाला मदत केली. संजय राऊत यांचा आवाज पुरोगामी चळवळीचा आहे. मात्र राऊत याचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय. कदम यांच्या वर संशयास्पद बोलणे चुकीचे  आहे. महाविकासआघाडी मधील नेत्यांवर राऊत यांनी बोलणे हे दुर्दैवी आहे, अशी खंत विशाल पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.   


 



हे ही वाचा :


Vishal Patil : सांगलीचा भडका उडणार? उद्यापर्यत काहीतरी निर्णय होईल, आम्ही टेन्शन घेत नाही; विशाल पाटलांचं सूचक वक्तव्य