Sanjay Raut : सांगली लोकसभेतून (Sangli Loksabha) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना विजयी करुन संसदेत पाठवण्यासाठी आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. लवकरच विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि काँग्रसचे प्रमुख नेते प्रचारात सक्रिय होतील असे राऊत म्हणाले. आम्ही सगळेजण एकत्र काम करुन भाजपचा पराभव करु असे राऊत म्हणाले. 


मैत्रीपूर्ण लढत हा शब्द घातक


दरम्यान, मैत्रीपूर्ण लढत हा शब्द घातक आहे. आख्ख्या महाराष्ट्रात हा प्रयोग होऊ शकतो असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी तिघांचे एकमत झाल्याचे राऊत म्हणाले. काँग्रेस हायकमांडशी बोलणे झाले आहे. यामुळं चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील हे जबाबदारीने आपण बोलत असल्याचे राऊत म्हणाले. शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे. पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल असं राऊतांनी सांगितलं. काही ठिकाणी शिवसेना, तर काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रह आहे. पण वरिष्ठ पातळीवरुन कार्यकर्त्यांना सांगायचे असते असे राऊत म्हणाले. फ्रेंडली फाईटबाबत बोलणारे अनिस अहमद कोण? असा सवाल संजय राऊतांनी केला. फ्रेंडली फाईटचे अधिकार वरीष्ठ पातळीवरुन होतील. 


महाजन तुम्ही जळगाव वाचवा


नाना पाटोले यांच्या टीकेवर बोलताना राऊत म्हणाले की, पटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. पटोलेसंदर्भात बाकी काही बोलण्यास राऊतांनी नकार दिली. दरम्यान, गिरीष महाजन यांच्यावरही राऊतांनी टीका केली. महाजन तुम्ही जळगाव वाचवा. तुम्हाला तुमची जागा  दाखवण्यासाठीच आम्ही तिथं शिवसेना उमेदवार उभा केला असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. पण भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत. त्याचं काय? आता त्यांच्याकडे  वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 


सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा


सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. कारण ठाकरे गटाकडून इथून पैलवान चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. सांगलीतून विशाल पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासाठी विश्वजीत कदम, विक्रम सावंत हे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस हायकमंडशी चर्चा करत आहे. त्यामुळं सांगलीत नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


महत्वाच्या बातम्या:


'सांगली'वरून वाद पेटला असताना संजय राऊतांची विश्वजित कदमांना फोनाफोनी; सोनहिरा कारखान्यावर पोहोचले