Vishal Patil : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) सांगलीतून (Sangli) काँग्रेसचे 4 ते 5 आमदार निवडूण आणू असं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी केलं. तसेच आगामी काळात वसंतदादाच्या विचारांचा आणि सांगलीचा मुख्यमंत्री झाला पाहीजे असंही पाटील म्हणाले. सांगली काँग्रेसच्या वतीनं मिरजमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभात विशाल पाटील बोलत होते.
सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचा विचार वाढवावा
दरम्यान, यावेळी विशाल पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या वाईट वागणूकीचा बदला मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला असल्याचे विशाल पाटील म्हणाले. विशाल पाटील यांचा मिरजमध्ये सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्ह्यात चार ते पाच आमदार निवडून आणू असंही पाटील म्हणाले. सर्वच समाजाच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मतदान केलं आहे. मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या अपमानाचा बदला या निवडणुकीत घेतल्याचे विशाल पाटील म्हणाले. तुम्ही मला निवडूण दिलं आहे. तुम्ही प्रत्येकजण खासदार आहात असे विशाल पाटील म्हणाले. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचा विचार वाढवावा असेही विशाल पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Majha Katta : मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित