Sadhus Beaten In Sangli : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा साधू मारहाण प्रकरणी (Sadhus Beaten In Sangli) अटकेत असलेल्या सात आरोपींना आज जत न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सांगली पोलिस 4 साधूंच्या संपर्कात आहेत. पोलिसांकडून पुन्हा साधूंचा जबाब नोंदवला जाणार आहे. 


पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना मारहाण करणाऱ्या सात आरोपींना आज दुपारी जत न्यायालयात हजर केलं जाईल. जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी या साधूंना बेदम मारहाण केली होती. मुले चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण झाली होती. 


मारहाणीत लवंगा गावच्या सरपंचांच्या मुलाचा समावेश


चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात एकूण 25 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेत असलेले आमसिध्दा तुकाराम सरगर आणि लहु रकमी लोखंडे, हे दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आमसिध्दा तुकाराम सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे. लहू रकमी लोखंडे हा माजी सरपंच आहे. सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार व शिवाजी सिधराम सरगर अशी अटकेतील अन्य लोकांची नावे आहेत. 


सांगली पोलीस 4 साधूंच्या संपर्कात


मारहाण झालेल्या साधूंचे जबाब पुन्हा सांगली पोलीस घेण्याच्या तयारीत आहेत. सांगली पोलीस या 4 साधूंच्या संपर्कात देखील आहेत. काल या मारहाणीची गांभीर्यता समोर आल्यानंतर सुमोटो पोलिसांनी तक्रार दाखल करत गुन्हे दाखल करत काही आरोपी अटक केल्याने साधूंचे जबाब पुन्हा पोलीस घेणार आहेत.


मारहाण झालेल्या दिवशी साधूंनी आपली नागरिकांनी केलेल्या मारहाणीबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे जबाबामध्ये सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले होते, पण मारहाण झालेले 4 साधू सध्या नेमके कुठे आहेत? त्याचे सध्याचे लोकेशन काय  हे मात्र गुप्त ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या