Sangli : सांगलीमध्ये (Sangli) शिक्षक सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिकमध्ये सभेमध्ये शिक्षकांचा राडा झालाय. सभेत शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून धक्काबुक्की (Sangli Teachers Fight) केली आहे. मागील सभेमधील विषय मंजुरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. सांगलीमधील डेक्कन हॉलमध्ये शिक्षक सेवकांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी शिक्षकांमध्ये राडा झालाय. दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी असलेले शिक्षकच धक्काबुक्की करताना दिसल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येतय. 


विषय मंजूरीवरून सोयायटीच्या सत्ताधारी आणि विरोधकात धक्काबुक्की


सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा झाला. सभेत शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून  धक्काबुक्की केल्याने काही काळ सभेत त गोंधळ निर्माण झाला. मागील सभेतील विषय मंजूरीवरून सोयायटीच्या सत्ताधारी आणि विरोधकात ही धक्काबुक्की झाल्याची माहिती शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या काही सदस्यांनी दिली.


शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची  91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा


सांगलीतील (Sangli Teachers Fight) माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची  91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या सुरुवातीपासूनच गोंधळ सभेमध्ये निर्माण झाला होता . यामध्येच मागील सभेतील विषयाच्या मंजुरीचा मुद्दा उपस्थित होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभेच्या पुढच्या बाजूस सत्ताधाऱ्यांनी विरोधी गटातील काही सदस्य आमने सामने आले आणि त्यामध्ये धक्काबुक्कीला सुरुवात झाली.





VIDEO : खासदार धैर्यशील मानेंचा ड्रायव्हर आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरची हाणामारी, एकमेकांचे कपडे फाडले; हसन मुश्रीफांसमोर राडा